आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कामगारांमध्ये तृणधान्याबाबत जागृती‎

नाशिक‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष‎ २०२३ हे केंद्र सरकारने जाहीर केले‎ असून यानिमित्त राज्य विमा‎ कामगार सोसायटीच्या वतीने अंबड‎ व सातपूर औद्योगिक वसाहतीतील‎ कारखान्यांमधील कामगार‎ अधिकारी यांच्यात आहाराविषयी‎ जनजागृती करण्यात आली.‎ राज्य विमा कामगार‎ सोसायटीच्या विद्यमाने वैद्यकीय‎ प्रशासन अधिकारीद्वारे महाराष्ट्र‎ राज्य विमा सोसायटी सेवा‎ दवाखाना अंबड येथे विमेदार‎ रुग्णांकरिता आरोग्य आणि‎ जनजागृती शिबिर आयोजित‎ करण्यात आले. या शिबिरास‎ वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ.‎ राजश्री पाटील (जवादे) , डॉ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अपूर्वा पत्तेवार, डॉ. अनिता विश्वास‎ भामरे आणि पौष्टिक तृणधान्यांचा‎ प्रचार-प्रसार करणारे शशिकांत‎ बोडके उपस्थित होते. अजित‎ भालेराव यांनी प्रास्ताविक केले.

डॉ.‎ राजश्री पाटील यांनी कार्यक्रमास‎ उपस्थित विमेदार रुग्णांना विविध‎ योजनांची माहिती दिली. कामगार‎ विमा सोसायटीच्या नव्याने सुरू‎ झालेल्या घोटी आणि दिंडोरी‎ औद्योगिक क्षेत्रातील सेवा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दवाखान्यांची माहिती देऊन या‎ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन‎ केले. रोजच्या आहारामध्ये भरड‎ धान्याचे महत्त्वदेखील त्यांनी स्पष्ट‎ केले. दिनकर गायकवाड,‎ मधुकर शिरसाठ, समीर सय्यद,‎ मंगेश बारी, कैलास कहांडळ,‎ प्रियांका मुनेश्वर, जयवंत आढाव,‎ सतीश सोनवणे, प्रतिभा उकिरडे,‎ जयश्री गावंडे यांचे सहकार्य‎ लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...