आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सायकल यात्रेद्वारा एचआयव्हीबाबत जनजागृती

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही समाजात एचआयव्ही व महिलांच्या आरोग्यच्या प्रश्नाबाबत अनेक गैरसमज आहे. याबाबत जनजागृती करत डॉ. पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर यांनी सायकलवर महाराष्ट्र सायकल संवाद यात्रा काढली आहे. त्यांचे नाशिक शहरात आगमन झाले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ. पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर हे सायकल यात्रेवर निघाले. परभणी, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, जळगाव, धुळे, नाशिक, नारायणगाव, पुणे या मार्गाने सायकलिंग करत वाटेत सामाजिक संस्था, अनाथाश्रम, आश्रमशाळा, रुग्णालये, विविध सोशल ग्रुप, तीर्थक्षेत्र आदींना भेट देत मुंबईत सायकल यात्रेचा समारोप करतील. या मोहिमेत ते सर्वसामान्यांमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती करण्याबराेबरच एड्सग्रस्त रुग्णांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागृती करून सर्वसामान्य व शासनाचे लक्ष वेधणार आहेत. याचप्रमाणे स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न जसे मासिक पाळी व्यवस्थापन, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व सायकलिंगमधून ‘इंधन बचाओ’चा संदेश देणार आहेत. समाजात जागृती करण्यासाठी या सायलकलिस्टने घेतलेल्या पुढाकारचे कौतुक करण्यात येत आहे. या मोहिमेत एड्सग्रस्त रुग्णांच्या मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

परभणीतून प्रारंभ, मुंबईत समाराेप
डॉ. पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर यांनी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे परभणी येथून सायकल यात्रेला प्रारंभ केला. मुंबईत या यात्रेचा समारोप करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...