आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मालेगावमध्ये काेराेना नियंत्रणासाठी उर्दू, अरबी भाषेत सव्वा लाखाहून जास्त कुटुंबीयांशी संवादातून जनजागृती

नाशिक (नीलेश अमृतकर)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्तव्यधर्म मानून जिवावर उदार हाेत समन्वयक कडासने बनले काेराेना याेद्धा

देशभरात संवेदनशील मानल्या गेलेल्या मालेगाव शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी गेल्या दशक-दीड दशकापासून त्यांची आेळख पुसून ‘भाईचाऱ्या’ने राहून एक चांगला संदेश दिलेला आहे. ‘काेराेना’च्या महामारीत हेच शहर हाॅटस्पाॅट बनले. परंतुै जिल्हा प्रशासन, आराेग्य विभाग आणि त्यास पाेलिस यंत्रणेची जाेड मिळाल्याने आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. या यंत्रणेत समन्वय साधण्याची भूमिका बजावण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पाेलिस अधीक्षक सुनील कडासने यांचा वाटा अतिशय माेलाचा ठरत आहे. मुस्लिमबहुल भाग असलेल्या मालेगावमध्ये उर्दू, अरबी भाषेत थेट माेहल्ल्यात शिरून माैलानांना साेबत घेत महिला, मुलांशी संवाद साधून त्यांना काेराेनापासून दूर राहण्याची व त्यासाठी आवश्यक सूचना ते देत आहेत.

जनसंपर्काचे जाळे ठरले उपयाेगी

मालेगावी चार वर्षे अपर पाेलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना कडासने यांनी जात, धर्म, भाषा, प्रांत याचा कुठलाही अडसर निर्माण न हाेऊ देता परिवाराचे नाते निर्माण केले हाेते. बदली झाल्यानंतरही तेथील माैलाना, दाेन्ही धर्मांचे लाेकप्रतिनिधी, सामान्य व्यक्तींशी नाते कायम ठेवले. त्यांनी जनसंपर्काचे निर्माण हे केलेले जाळेच त्यांना या कामात उपयुक्त ठरले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न केवळ दंडुक्यानेच साेडता येताे, असे चित्र असताना त्याला छेद देत केवळ सामाजिक सलाेखा व भाषेच्या जाेरावरही ताे साेडविता येऊ शकताे, हे दाखवून देण्यात कडासने यशस्वी ठरले. ते सध्या काेराेनाची नियंत्रणात आलेेली मृत्यू व रुग्णसंख्येवरून दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...