आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला दिनानिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आरोग्य व पर्यावरणाचा जागर करण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. ११) "नाशिक सक्षम नारी सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले. गो ग्रीन थीमवर सायकल रॅलीत २७० महिलांनी सहभाग नोंदवत आराेग्य संवर्धन व पर्यावरणरक्षणाचा जागर केला. सायकल रॅलीनिमित्त उत्कृष्ट संदेश बोर्ड, उत्कृष्ट सायकल सजावट तसेच उत्कृष्ट वेशभूषा या विषयांवर स्पर्धा देखील घेण्यात आली. गो ग्रीन थीमवर महिलांचा सहभाग उत्स्फूर्त हाेता . विशेष म्हणजे अनेक महिलांनी सायकल बरोबर हेल्मेटची देखील सजावट केली होती व पर्यावरणाशी निगडित संदेश दिले. झीन झुंबा फिटनेसच्या रिद्धी साहू यांनी उपस्थित महिलांचे वॉर्मअप घेतले.
पाेलिस निरीक्षक सारिका अहिरराव, प्लॅस्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल राइडला सुरुवात झाली. अनंत कान्हेरे मैदान - मायको सर्कल - एबीपी सर्कल - जेहान सर्कल - जुना गंगापूरनाका - अशोकस्तंभ - सीबीएस - त्र्यंबकनाका - अनंत कान्हेरे मैदान असा मार्ग होता. यानंतर डॉ. मनीषा रौंदळ, साधना दुसाने, माधुरी गडाख, निशा निराली, संगीता बडगे, सीमा घुगे, किरण डोंगरे, सुवर्णा देशमुख यांनी "सायकल सखी’ या विषयावर पथनाट्य सादर केले. व या नाटिकेतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकललाच सखी माना व सायकलशी नातं जोडा याबद्दल प्रबोधन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे हरीश बैजल, आमदार सत्यजित तांबे, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डॉ. श्वेता बच्छाव, रोहिणी नायडू, अनुराधा नडे, शिल्पा पारनेरकर, राजेंद्र भावसार, डॉ. मंजू अटल आदी उपस्थित होते. अध्यक्ष किशोर माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आजची नारी ही स्वतःच्या आरोग्यासाठी जागृत झाली, याबद्दल विशेष कौतुक केले. अध्यक्ष किशोर माने यांच्याकडून आलेल्या सर्व महिलांना एक भारतीय परंपरेचे वृक्ष देण्यात आले.
सहा विद्यार्थिनींना सायकल वाटप
महिला दिनाचे आैचित्य साधत त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव शाळेच्या सहा गरजू विद्यार्थिनींना यावेळी सायकल वाटप करण्यात आले. त्यांची शाळेत जाण्याची गैरसाेय दूर हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.