आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एचआयव्ही, स्त्रियांच्या आरोग्यावर जागृती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजही समाजात एचआयव्ही व महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत अनेक गैरसमज आहेत. याबाबत जनजागृती करत डॉ. पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर यांनी सायकलवर महाराष्ट्र सायकल संवाद यात्रा काढली आहे. हे सायकलिस्ट नुकतेच शहरात पोहाेचले. त्यांचा सत्कार नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.

पाडवा व भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ. पवन सत्यनारायण चांडक व नितीन शेवलकर हे परभणी, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, जळगाव, धुळे, नाशिक, नारायणगाव, पुणे या मार्गाने सायकलिंग करत वाटेत विविध सामाजिक संस्था, अनाथाश्रम, आश्रमशाळा, रुग्णालये, विविध सोशल ग्रुप, तीर्थक्षेत्र आदींना भेट देत मुंबई येथे सायकल यात्रेचा समारोप करतील.

या मोहिमेत ते सर्वसामान्य लोकांमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती करण्याबराेबरच एड्सग्रस्त रुग्णांचे मूलभूत प्रश्नांवर जनजागृती करून सर्वसामान्य व शासनाचे लक्ष वेधणार आहेत. याचप्रमाणे स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न जसे मासिक पाळी व्यवस्थापन, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व सायकलिंगमधून ‘इंधन बचाओ’चा संदेश देणार आहेत. समाजात जागृती करण्यासाठी या सायलकलिस्टने घेतलेल्या पुढाकारचे कौतुक करण्यात येत आहे. या मोहिमेत ते सर्वसामान्य लोकांमध्ये एड्सग्रस्त रुग्णांच्या मूलभूत प्रश्नांबाबत जनजागृती करून त्याकडे शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...