आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकस्थित अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड अॅण्टीहॅरेशमेंट साेसायटी (आवास) या संंस्थेच्या वतीने भारतात ‘मिशन रेबीज फ्री इंडिया’ उपक्रम राबविला जात आहे. यासाठी संस्थेने अमेरिकेतून ७ काेटी २० लाख रुपयांचा मर्सिडीज कंपनीचा अत्याधुनिक विशेष ट्रक मागवला आहे. आवास ‘रेबीज फ्री नाशिक’ उपक्रम ९ जानेवारीला सुरू करत असून हा ट्रक ७ जानेवारीला सिडकाेत दाखल हाेईल. अमेरिकेतील मिशन रेबीज आणि वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिसेस या दाेन संस्थांसाेबत ‘आवास’ने करार केला आहे. या उपक्रमात कर्नाटक, आंध्र प्रदेश, आेडिसा या राज्यांत ३५ हजार श्वानांचे रेबीज लसीकरण व त्यांचे निर्बीजीकरण केले. नाशिक शहराचे पाच विभाग करून ७ पशुवैद्यकांच्या टीमद्वारे ही माेहिम राबवली जाईल. यात भटक्या व पाळीव श्वानांना माेफत लस दिली जाईल.
श्वानाच्या अंगावर निर्बीजीकरणानंतर विशिष्ट खूण ज्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण माेहिमेत पूर्ण हाेईल, त्या श्वानांवर एका रंगाची विशिष्ट खूण केली जाईल. यामुळे पुन्हा हा श्वान समाेर आला तरी त्याची माहिती मिळेल. यासाठीच्या अॅपवर त्या श्वानाची संपूर्ण माहितीही अपडेट हाेईल.
असा आहे २४ फूट उंचीचा हा ट्रक हा ट्रक संपूर्ण वातानुकूलित असून त्याची उंची २४ फूट आहे. ताे पाहिजे तसा विस्तारीत करता येताे. त्यात तीन जनरेटर, गॅस अनेस्थेशियासाठी हवेतून आॅक्सिजन तयार करणारी यंत्रणा, श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज आॅपरेशन थिएटर, डाॅक्टरांसाठी रेस्ट रूम, स्वयंपाकगृह, अत्याधुनिक आॅपरेशन उपकरणे आहेत.
मनपाला कामात सहयाेग आवास ही नाशिकचीच संस्था असल्याने त्याचा फायदा नाशिकसाठी व्हावा म्हणून ही माेहीम आम्ही येथे राबवत आहाेत. यातून महापालिकेच्या कामाला सहयाेग मिळेल. - वृषाली क्षत्रिय, प्रकल्प समन्वयक, आवास
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.