आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:सिग्नल यंत्रणेच्या अस्ताव्यस्त कारभाराने वाहनचालक त्रस्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिग्नल यंत्रणा जणू काेलमडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तर सिग्नल असून नसल्यासारखेच आहेत. तर ज्याठिकाणी सिग्नल आहेत तेथेही लपंडाव बघायला मिळताे. अनेक ठिकाणी सिग्नल्सवर असलेले काउंंटर्स बंद असल्याने वाहनचालक सिग्नल न सुटताच सुसाट निघतात. यामुळे अपघातही हाेत आहे.

तर सीबीएस, त्र्यंबकनाका, द्वारका चाैक असे माेठे परिसर साेडले तर इतर भागातील सिग्नल्सवर वाहतूक पाेलिस दिसतच नाहीत. जेव्हा सिग्नल यंत्रणा बंद हाेते तेव्हा या ठिकाणी वाहतूक विस्कळीत हाेते. लहान-माेठे अपघात हाेतात. पण पाेलिसांचे याकडे सर्रास दुर्लक्ष आहे. यामुळे वाहनचालक मात्र चांगलेच त्रस्त झालेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...