आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योजक व कामगार यांचे आरोग्य निरायम रहावे या हेतूने आयमातर्फे विश्वास लॉन्स येथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेत रविवारी सायंकाळी ‘रेनायसन्स’ संघाने अंतिम फेरीत कनेक्ट इंडियाचा चुरशीच्या लढतीत पराभव करून विजेतेपदाचा करंडक तसेच २१ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकाविले. अभिषेक व्यास यांनी पारितोषिक स्वीकारले. आैद्याेगिक वर्तुळात स्पर्धेसाठी उत्सुकता हाेती.
उपविजेत्या संघास मिळालेले ११००० रुपयांचे बक्षीस हर्षद बेळे यांना प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रॉयल इंकचे वाजीद देशमुख यांची निवड झाली. सहा सामन्यांत त्यांनी १० बळी घेतले. अंबर फोर्जचे सुमीत गायकवाड उत्कृष्ट फलंदाज ठरले. त्यांनी ५ सामन्यांत १४२ धावा केल्या. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा किताब आकाश देवरे याने पटकावला. रेनायसन्सचे दीपक मिश्रा यांची सामनावीर म्हणून निवड झाली. स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला होता.
क्रिकेटमुळे खिलाडूवृत्ती जोपासली जाते-नितीन गवळी
आयमातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे उद्योजक आणि कामगार यांच्यातील सौहार्दाचे वातावरण कायम राखण्याबरोबरच त्यांच्यातील खिलाडूवृत्तीही जोपासली जाते. असे उपक्रम राबविले गेले पाहीजे असे प्रतिपादन औद्योगिक विकास महामंडळाचे नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी यावेळी केले.
राउंड रॉबिन पद्धतीने सामने
स्पर्धेत सहभागी झालेल्या २० संघांमध्ये राउंड रॉबिन पद्धतीने हे सामने खेळविण्यात आले. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राधाकृष्ण नाईकवाडे, करन सिंग पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
आयमाच्या क्रीडा समितीचे चेअरमन जयंत पगार, राहुल गांगुर्डे, हर्षद बेले, अभिषेक व्यास, धीरज वडनेरे यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आयमाचे बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, माजी चेअरमन धनंजय बेळे, राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे हेही उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.