आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची तपासणी:आयुर्वेद सेवा संघाच्या आरोग्यशाळा रुग्णालयात आज माेफत शिबिर

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेद सेवा संघाच्या पंचवटीतील गणेशवाडी आरोग्यशाळा रुग्णालयात शल्य विभागामध्ये गुरुवारपासून दाेन दिवसीय हर्निया आणि अंडाशय वृद्धी तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. बेंबीच्या ठिकाणी फुगवटा येणे, जांघेच्या ठिकाणी फुगवटा येणे, अंडकोशाच्या ठिकाणी आकार लहान मोठा होणे आणि त्यामध्ये पाणी होणे, ही लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जाईल.

यानंतर तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असेल त्यांच्यावर तातडीने नियाेजन करून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. वैद्य विनय सोनांबेकर, वैद्य पंकज दीक्षित, वैद्य संतोष पाठक, प्रीती शेजवळ, वैद्य सरोज मुखिया, वैद्य सुहास विभुते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुर्वेद सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...