आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात एकता कायम ठेवण्यासाठी आवाहन:‘बाबरी’ स्मृतिदिनानिमत्त ‘अजान’; शांततेसाठी दुआ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बाबरी’ स्मृतिदिनानिमत्त ६ डिसेंबर या तारखेच्या औचित्यावर शहरात एमआयएम पक्ष व रझा अकादमीसह काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये मोजक्याच संख्येने दुपारी एकत्र येत सामूहिकरित्या अजान दिली. जुने नाशिक परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौक, बडी दर्गा शरीफ भाग, चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, नानावली, नाईकवाडीपुरा, काझीपुरा, मोहम्मद अलीराेड (वडाळा), आयेशा मशीद परिसर, खडकाळी, कोकणीपुरा या भागांमधून सातत्याने सुमारे पाच मिनिटे तीन वेळा अजानचा आवाज कानी पडला. दरम्यान, भद्रकाली, इंदिरानगर, मुंबईनाका पोलिसांच्या वतीने जुने नाशिक, भाभानगर, वडाळारोड, वडाळागाव भागात रविवारी सकाळपासूनच चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नियमित गस्तीमध्येही वाढ करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून सामाजिक सलोखा व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामूहिकरित्या विशेष दुआही पठण करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...