आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबी. फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून यात शहरातील बहुतांश महाविद्यालयांत २५ टक्के विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करत प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. तर काही महाविद्यालयांत २८ ते ३० टक्क्यांपर्यंत प्रवेश झाले. पहिल्या कॅप राउंडमध्ये १०० टक्के जागा वाटप (अलाॅटमेंट) होऊनही ७० ते ७५ टक्के विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॅप राउंडसाठी बेटरमेंटचा (चांगला) पर्याय निवडण्याला पसंती दिली आहे. पसंतीचे काॅलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ३०० पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पहिल्या कॅप राउंडनंतर शनिवारी (दि. १७) रिक्त जागांचा तपशील जाहीर झाला. त्यानुसार आता पहिल्या फेरीत पसंतीचे काॅलेज मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॅप राउंडसाठी पसंतीक्रम बदलण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुसऱ्या कॅप राउंडसाठी १८ ते २० डिसेंबर यादरम्यान पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यानंतर २२ डिसेंबरला निवड यादी जाहीर होईल. या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या कॅप राउंडमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असेल.
नाशिकसह विभागात बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या ९१ महाविद्यालयांत ७ हजार ३८० जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, नाशिक विभागातील ७ हजार ३८० जागांसाठी तब्बल १२ हजार ९०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पहिल्या कॅप राउंडमध्ये महाविद्यालयांत २५ ते ३० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर काही विद्यार्थी बेंटरमेंटच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थी व पालकांचे लक्ष आता दुसऱ्या कॅप राउंडच्या निवड यादीकडे लागले आहे.
प्रवेशासाठी २८ सुविधा केंद्र
फार्मसीच्या प्रवेशासाठी नाशिक विभागात ९१ तर नाशिक जिल्ह्यात २८ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना आॅप्शन फार्म भरण्यासह रिपोर्टिंग प्रक्रियेविषयी सर्व माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची काही अडचण असल्यात त्वरेने येथे संपर्क साधावा, असेदेखील कळविण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.