आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी.फार्मसीसाठी दुसरा कॅप राउंड:विद्यार्थ्यांनी 20 डिसेंबरपर्यंत नोंदवावा पसंतीक्रम

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी. फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी दि.17 डिसेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर झाला. त्यानुसार आता पहिल्या फेरीत पसंतीचे काॅलेज मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॅप राउंडसाठी पसंतीक्रम बदलण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुसऱ्या कॅप राउंडसाठी 18 ते 20 डिसेंबर या दरम्यान पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यानंतर 22 डिसेंबरला निवड यादी जाहीर होईल. या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 23 ते 26 डिसेंबर या कालावधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या कॅप राउंडमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असेल.

नाशिकसह विभागात बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या 91 महाविद्यालयांत 7 हजार 380 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, नाशिक विभागातील 7 हजार 380 जागांसाठी तब्बल 12 हजार 900 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पहिल्या कॅप राउंडमध्ये महाविद्यालयांत 25 ते 30 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. तर काही विद्यार्थी बेंटरमेंटच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थी व पालकांचे लक्ष आता दुसऱ्या कॅप राउंडच्या निवड यादीकडे लागले आहे.

असा होईल दुसरा कॅप राउंड

17 डिसेंबर- दुसऱ्या फेरीपूर्वी रिक्त जागांचा तपशील होईल जाहीर

18 ते 20 डिसेंबर- पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत

22 डिसेंबर- निवड यादी होईल जाहीर

23 ते 26 डिसेंबर- प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे

बातम्या आणखी आहेत...