आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बी. व्होक प्रिंटिंग टेक्नाॅलाॅजीच्या 13 विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र संचालित केटीएचएम महाविद्यालयातील बी. व्होक प्रिंटिंग टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील १३ विद्यार्थ्यांना आैरंगाबाद येथील एसीजी युनिव्हर्सल कॅप्सुल्स प्रा. लिमिटेड या कंपनीत प्लेसमेंटची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख ६० हजार रुपये इतके वेतन मिळाले आहे.

काैशल्याधिष्ठित शिक्षणाचा टप्पा पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले जाते. बी. व्होक अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षणक्रमांद्वारे काैशल्याचे शिक्षण मिळते. प्रिंटिंग टेक्नाॅलाॅजीच्या १३ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.

या विद्यार्थ्यांचा संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसीजी युनिव्हर्सल कॅप्सुल्स प्रा.लिमिटेडचे एचआर हेड योगेश कटारे यांनी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. सागर पेखळे, प्लेसमेंट हेड प्रा. राहुल पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...