आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालय अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्ते पुर्णपणे उखडले आहे. याच रस्त्यांवरुन रुग्णवाहिका आणि रुग्णालयाचे वाहने ये जा करतांना धुळ उडून रुग्णालयात येणाऱ्या नागरीकांना त्रास होत आहे. शासनाने सवि्हिल हाॅस्पिटल मेडीकल काॅलेजला करारावर हस्तांतरीत केले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे रुग्णालयाच्या बाह्य समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाढत्या समस्यांतून निदर्शनास येत आहे.
सिव्हिल हाॅस्पिटल अंतर्गत रस्ते पावसाळ्या पुर्णपणे उखडलेल आहे. पावसाळ्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्ते दुरस्थ होणे अपेक्षित असतांना विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवर खड्डा पडलेला असल्याने रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत आहे. अतीगंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिके वेगाने येतात मात्र खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाला इजा होण्याची शक्यता असल्याने रुग्णवाहिका चालकांना देखील वेगावर नियंत्रण ठेवतांना त्यांचे नियंत्रण सुटते.
हे रस्ते उखडले
रुग्णालया अंतर्गत प्रवेशद्वार, आय वार्ड, इनफेक्शन वार्ड, शवविच्छेदन कक्षाकडे जाणारा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने खड्डे पडले आहे. रस्ता रहदारीसाठी उपयोगी नसल्याने वाहने रस्त्यावर पार्किंग केले जात आहे.
इतर समस्या
रुग्णालाच्या विविध कक्षात स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीची समस्या आहे.डाॅक्टर, परिचारीका आणि कर्मचाऱ्यांना दुर्गंधी मध्ये काम करावे लागते. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या समोर रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे धुतलेले कपडे सुकत घालत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
मेडीकल काॅलेज प्रशासनाकडून पत्र
मेडीकल काॅलेज प्रशासनाकडून रस्ते दुरस्थीसाठी पत्र दिले आहे. बांधकाम विभागाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. रस्त्यावर लोखंडी पाईप असल्याने वाहनांना अडथला निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांना पाईप दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
बांधकाम विभागाकडून केवळ पहाणी
मेडीकल काॅलेज प्रशासनाचे डाॅ. राजकुमार सुर्यवंशी म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहाणी केली जाते मात्र दुरस्थीसाठी नियोजन केले जात नाही. रस्ते पुर्ण उखडल्याने यावरुन पायी देखील चालता येत नाही. रस्त्यात पाईप पडून आहेत. बांधकाम विभागाने रस्ते दुरस्थ करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.