आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:सिव्हिल हॉस्पिटलमधील रस्त्यांची दुरवस्था; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते पूर्णपणे उखडले आहे. याच रस्त्यांवरून रुग्णवाहिका आणि रुग्णालयाची वाहने ये-जा करतांना धूळ उडून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. शासनाने सिव्हिल हाॅस्पिटल मेडिकल काॅलेजला करारावर हस्तांतरित केले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रुग्णालयाच्या बाह्य समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाढत्या समस्यांतून निदर्शनास येत आहे.

सिव्हिल हाॅस्पिटल अंतर्गत रस्ते पावसाळ्यात पूर्णपणे उखडलेले आहेत. पावसाळ्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित असताना िवभागाकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डा पडलेला असल्याने रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत आहे.

अतिगंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका वेगाने येतात मात्र, खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाला इजा होण्याची शक्यता असल्याने रुग्णवाहिकाचालकांना देखील वेगावर नियंत्रण ठेवताना त्यांचे नियंत्रण सुटते.

विविध कक्षात दुर्गंधी रुग्णालयाच्या विविध कक्षांत स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीची समस्या आहे.डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना दुर्गंधीमध्ये काम करावे लागते. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर रुग्णांचे नातेवाइक रुग्णांचे कपडे वाळत घालत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

काॅलेज प्रशासनाकडून बांधकाम विभागाला पत्र मेडिकल काॅलेज प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे. मात्र त्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. रस्त्यावर लोखंडी पाइप असल्याने वाहनांना अडथळा हाेताे.

हे रस्ते उखडले रुग्णालयांतर्गत प्रवेशद्वार, आय वार्ड, इन्फेक्शन वार्ड, शवविच्छेदन कक्षाकडे जाणारा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने खड्डे पडले आहे. रस्ता रहदारीसाठी उपयोगी नसल्याने वाहने रस्त्यावर पार्किंग केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...