आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागेश्वर धाम वादात नाशिकमधील साधूंची उडी:अंनिस केवळ हिंदूंना टार्गेट करत असल्याचा आरोप, 51 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराच्या दाव्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. या वादात आता महाराष्ट्रातील साधू-संतांनी उडी घेतली आहे.

बागेश्वर बाबांनी आपले दावे आमच्यासमोर सिद्ध केल्यास त्यांना 30 लाखाचे बक्षीस दिले जाईल, असे आव्हानच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिले आहे. यावरुन नाशिकमधील अध्यातिमक प्रतिष्ठान महर्षीच्या साधूंनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका केली आहे.

...तर 51 लाखांचे बक्षीस देऊ

प्रतिष्ठानचे मंहत अनिकेत शास्त्री यांनी एक व्हिडिओ जारी करुन म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केवळ हिंदू धर्मियांना टार्गेट केले जात आहे. वास्तविक सर्वच धर्मियांमध्ये असा पाखंडीपणा काही प्रमाणात होत आहे. जसे की, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द व इतर धर्मातील काही गुरुंकडूनही कॅन्सर, टीबी, किडनी, एड्ससारख्या गंभीर आजारांचे निदान केले जाण्याचा दावा केला जातो. जमजमचे पाणी पिऊन कॅन्सर बरा करत असल्याचे दावे केले जात आहे.

इतर धर्मियांमधील जर काही गुरुंनी आपण एड्स, टीबी, कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचे दावे केले तर त्यांना आपण 51 लाख रुपयांचे बक्षिस देऊ, अशी घोषणाही मंहत अनिकेत शास्त्री यांनी केली.

बागेश्वर बाबांची प्रत्येक गोष्ट खरी असते का?:पं.धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात - मी सामान्य माणूस, लोकच माझ्याकडे समस्या घेऊन येतात

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा

महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा, अशीही मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. मंहत अनिकेत शास्त्री म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राज्यात लागू व्हावा, यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी कठोर प्रयत्न केले. मात्र, आज नरेंद्र दाभोळकर यांचा उद्देश आणि त्यांच्या अनुयायींचा उद्देश याच्यामध्ये फार मोठी तफावत दिसत आहे. या मागणीसाठी आज नाशिक येथील रामकुंडावर साधू, संत आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बागेश्वर बाबांचा चमत्काराचा दावा नाही

बागेश्वर बाबांविषयीची भूमिका स्पष्ट करताना महंत अनिकेत शास्त्री म्हणाले, 'बागेश्वर बाबा यांनी कधीही आणि कुठेही आपल्याकडे अद्भुत शक्ती असल्याचा दावा केलेला नाही. महाराजांकडे गेल्यामुळे माझे कल्याण झाले, असे त्यांच्या भक्तांचे म्हणणे आहे. केवळ या कारणावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत असेल तर ते चुकीचे आहे. बागेश्वर धामचे कार्य चांगले आहे. परंतु ते जर माझ्याकडे अद्भुत शक्ती आहे, असा दावा करत असतील तर ते सुद्धा निंदनीय आहे. त्याचे समर्थन सनातन धर्माने कधीही केलेले नाही, असेही महंत अनिकेत शास्त्री यांनी स्पष्ट केले.

इतर धर्मियांच्या अंधश्रद्धेकडेही बघा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीका करताना मंहत अनिकेत शास्त्री म्हणाले, अंनिसद्वारे फक्त आणि फक्त हिंदूंना टार्गेट केले जात आहे. इतर धर्मियांच्या अंधश्रद्धेकडे समिती बघत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा, अशी मागणी मंहत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.

लोकांच्या मनातील गोष्टी आपण दिव्य दृष्टीने ओळखतो, अनोळखी व्यक्तीचे नावही सांगू शकतो, असा दावा बागेश्वर बाबा यांनी केला आहे. त्यांनी हा चमत्कार सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे.

संबंधीत वृत्त

बागेश्वरच्या शास्त्रींनी स्वीकारले आव्हान:नागपूर अंधश्रद्धा समितीने केले होते चॅलेंज, म्हणाले- रायपूरला या, 30 लाखांची गरज नाही

बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या समितीचे आव्हान स्वीकारले आहे. समितीची 30 लाखांची ऑफरही त्यांनी नाकारली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी समितीच्या सदस्यांना 20 आणि 21 जानेवारी रोजी रायपूरला आयोजित करण्यात आलेल्या दरबारात जावे लागणार आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना तुमच्या प्रवासाचा खर्च देखील देण्याचे जाहीर केले. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...