आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे स्मारकावरून शिवसेनेत कुरघाेडी:अजय बाेरस्तेंकडून पक्षांतर्गत विराेधकांना दणका; आयुक्तांच्या उपस्थितीत पाहणी दाैरा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेच्या सत्ताकाळात दुरावस्था झालेल्या गंगापूर रोडवरील पपींग स्टेशनजवळील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नुतनीकरणासाठी महासभेत चिवटपणे पाठपुरावा करणारे माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांना डावलून उद्धव ठाकरे गटातीलच काही शिवसैनिकांनी स्वतंत्रपणे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केल्यामुळे पक्षांतर्गत कुरघाेडीचे राजकारण चर्चत आले. दरम्यान, बाेरस्ते यांनीही दणका देत मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना साेबत घेत रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी दाैरा केला.

प्रभाग क्रमांक ७ मधून बाेरस्ते हे निवडून आले असून आपल्या प्रभागात ठाकरे यांच्यानावाचे स्मारकाची दुरावस्था झाल्याचे बघून त्यांनी पालिकेकडून पाठपुरावा करीत नवीन आराखडा मंजूर केला. बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमक प्रतिमा तसेच त्यांचे विविध क्षेत्रातील नेपुण्य व एकुणच कलाप्रेम लक्षात घेत स्मारक भव्य दिव्य करण्याचे नियाेजन केले.

या कार्यक्रमासाठी खुद्द पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना बाेलवले गेले. त्यानंतर पालिकेत प्रशासकीय राजवट आली. त्यामुळे कामाची गती काहीशी मंदावली. नेमकी हीच बाब लक्षात घेत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांची भेट घेत आंदाेलनाचा इशारा दिला हाेता.

बाेरस्ते हे शिवसेनेच्या निवडणुक काेअर कमिटी सदस्य असून त्यांना डावलून ही भेट झाल्यामुळे त्यांच्या जिव्हारी बाब लागली. त्यांनी दुसऱ्याच दिवशी महत्वाच्या अधिकाऱ्यांसहीत स्मारकाचा पाहाणी दाैरा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, उपअभियंता नितीन राजपूत, उपअभियंता प्रशांत बोरसे, पश्चिम विभागीय अधिकारी हरिशचंद्र मदन व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला व मार्च २०२३ अखेर पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेशित केले.

राऊतांच्या दाैऱ्यानंतरही गटबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दहा ते बारा माजी नगरसेवक जातील अशी चर्चा हाेती. त्यावर उपाय याेजना करण्यासाठी राऊत हे नाशकात आले हाेते. त्यांनी सर्वांना आश्वास्त करून मुंबईची वाट धरली मात्र त्यानंतर शिवसेनेतील कुरघाेडीचे राजकारण सुरूच आहे. विशेष म्हणजे, यापुर्वीही खुद्द आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत याच स्मारकाच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम असताना पाेलिस परवानगीच्या मुद्यावरून बाेरस्ते यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला हाेता.

स्मारक करणे हाच ध्यास

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य दिव्य स्मारक करणे हाच माझा ध्यास असून त्यासाठी सत्ता नसताना माझा पाठपुरावा सुरू आहे. मार्च २०२३ पर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण हाेतील. यावरून काेणीही राजकारण केले तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजय बाेरस्ते.

बातम्या आणखी आहेत...