आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात चारचाकी वाहने चोरी करणारी टोळी कार्यरत असून या टोळीकडून कार वायफायच्या अधारे हॅक करून कारचा दरवाजा उघडून चोरी केली जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी (29 जुलै) श्रीराम कुंज टाकळीरोड द्वारका येथे घडला. 8 जुलै रोजी पळसे येथून अशाच प्रकारे फोर्चुनर कार चोरी करण्यात आली होती. नाशिकरोड पोलिसांनी राजस्थान येथून कार शोधून आणली होती.
गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अरुण डोंगरे रा. टाकळी रोड द्वारका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मालकीची बलेनो कार एमएच 15 जीएल 9141 इमारतीच्या पार्किंग मध्ये व्यवस्थित लॉक करुन पार्किंग केलेली असतांना कार कशाने तरी उघडून चोरी केली. कार बघण्यास गेले असता त्यांना कार दिसली नाही. भद्रकाली पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
कार मधून आले तीन संशयित
इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयित कार मधून आल्याचे दिसून येत आहे. कार मध्ये बसून लॅपटॉपच्या अधारे वायफायने कारची सिस्टीम हॅक करत कार चोरी केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कार चोरीचे राजस्थान कनेक्शन?
कार चोरी करणारी राजस्थानची टोळी सक्रिय असल्याचे नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढे आले आहे. पथकाने कार चालक बाबुलाल बिश्नोई यास अटक केली होती. त्याच्या चौकशीत मुकेश खिल्लारे, सुरेश खिल्लारे या दोघा मास्टरमाईंडचे नावे निष्पन्न झाले होते. दोघे फरार आहेत.
चोरांचे गाव म्हणून कुप्रसिद्ध
राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील साचोर हे कार चोरांचे गाव म्हणून कुप्रसिद्ध आहे. खिल्लारे याच गावचे रहिवाशी आहेत. ही टोळी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहन चोरी करुन पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्ये विक्री करत असल्याचे तपासात पुढे आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.