आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरित बालकांच्या शोधासाठी:बालरक्षक' अॅपचा आधार, 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हंगामी स्थलांतरित बालकांची सर्व्हेक्षण

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळाबाह्य झालेल्या या विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे हंगामी स्वरुपात स्थलांतरित होणाऱ्या मुलांच्या शोधासाठी शिक्षण विभागाने सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहीमेद्वारे स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या महापालिका शाळेत दाखल केले जाणार आहे. विशेष म्हणजे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना बालरक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असून अशा मुलांची नोंद घेण्यासाठी बालरक्षक अ‌ॅपही सुरु करण्यात आले आहे.

या सर्व्हेक्षणातही आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद या अ‌ॅपमध्ये केली जाणार असल्याने आता एका क्लिकवर शाळाबाह्य मुलांची माहिती मिळू शकेल.

कोविडच्या दोन वर्षाच्या कालावधित शाळा बंद असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचू शकल्या नाही. या दोन वर्षात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले. कोविडनंतर शाळा आता पुन्हा सुरु झाल्या असल्या तरी अजूनही अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शिक्षण विभागातर्फे नाशिक महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागामध्येही २० नोव्हेंबरपासून हंगामी स्थलांतरित बालकांचे सर्व्हेक्षण मोहीम सुरु केली आहे.

शहरातील सर्व केंद्रप्रमुख यांनी ही सर्वेक्षण मोहीम राबवताना शिक्षकांकडून आपल्या केंद्रातंर्गत येणाऱ्या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करावे. या परिसरात एकही स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांची माहिती शिक्षक प्रगणक यांनी प्रपत्र अ लिंक ( https://forms.gle/toXds27B22XpBHEE8 ) व प्रपत्र ब लिंक (https://forms.gle/t6a9dwR5HZgsjLnp9 ) यामध्ये नोंद करावी. तसेच मुख्याध्यापकांनी बालरक्षक अ‌ॅपमध्ये सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

झोपडपट्टी, बसस्थानके, वीटभट्टी परिसरात सर्व्हेक्षण

मोलमजुरी करणारे कुटुंब अनेकदा रोजगाराच्या शोधात हंगामी स्वरुपात स्थलांतरित होत असतात. सर्वाधिक स्थलांतरित विद्यार्थी हे वीटभट्टी, उसतोड भागात, मोठी बांधकाम प्रकल्प, दगड खाणी, शेतीच्या कामांसाठी, रस्त्यांची कामे, औद्योगिक वसाहती, रेल्वे स्थानक व बसस्थानके अशा ठिकाणी आढळून येत असतात. शहर व परिसरातील अशा ठिकाणी स्थलांतरित व शाळाबाह्य झालेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसर, फुटपाथ या ठिकाणांसह बालगृहांमध्येही शोध घेतला जाणार आहे.

त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार

''कोविड काळात व त्यानंतर अनेक मुले शाळाबाह्य झालेली आहे. या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच हंगामी स्थलांतरित मुलांच्या शोध घेण्यासाठी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मुलांना जवळच्या शाळेत दाखल करून घेतले जाईल. त्यांचे आधार कार्ड व इतर आवश्यक माहिती संकलित करून घेतली जात आहे. या मोहीमेद्वारे शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल.'' - सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग

बातम्या आणखी आहेत...