आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा यांनी 16 वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या त्रिपुरा संघात विजय पटकावला. या स्पर्धेमध्ये जोरदार खेळ करत त्यांचा विजय झाला.
सुरत येथे सुरू झालेल्या बी.सी.सी.आय. च्या विजय मर्चंट ट्रॉफीत डावखुरा सलामीवीर साहिल पारखने आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत 68 चेंडूत 11 चौकरांसह 64 धावा फटकावल्या. तर पाचव्या क्रमांकावरील दिर्घ ब्रम्हेचाने 46 चेंडूत 6 चौकरांसह 35 धावांचे योगदान दिले .त्यांच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेईल होते त्यासह अराहन सक्सेना 58 , शुश्रुत सावंत 43 ,नारायण डोके 34 व कार्तिक शेवाळे 33 यांच्यामुळे प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाच्या 313 धावा झाल्या .
उत्तरादाखल त्रिपुराचा पहिला डाव 88 धावांत गडगडला. महाराष्ट्र संघातर्फे कार्तिक शेवाळेने 6 तर सुशिक जगतापने 3 बळी घेतले. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावातही त्रिपुराला 112 पर्यंतच मजल मारता आली . दुसऱ्या डावातही कार्तिक शेवाळेने परत 4 व शतायु कुलकर्णीने 4 बळी घेतले. त्यामुळे महाराष्ट्र संघाने 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या खेळीमुळे नाशिकचे क्रीडा क्षेत्राचे नाव पुन्हा एकदा उंचावले गेले आहे. आगामी सामन्यात हे खेळाडू याच प्रमाणे खेळ करत संघाला विजय मिळवून देतील असा विश्वास प्रशिक्षकांसह खेळाडूंकडून व्यक्त केला जात आहे
महाराष्ट्र संघाचा पुढील सामना 6 डिसेंबरला मध्य प्रदेश बरोबर होणार आहे. ह्या पहिल्याच सामन्याच्या विजायातील दोन्ही उदयोन्मुख कुमार क्रिकेट खेळाडूंच्या कामगिरी मुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे कौतुक करून स्पर्धेतील यापुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.