आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील 19 वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राने उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत डेहराडून येथे खेळलेल्या साखळी स्पर्धेत नुकतेच घणाघाती दिडशतक झळकवत अफलातून फलंदाजीचे प्रदर्शन घडवले होते . त्यापाठोपाठ पुदूचेरी येथे उपउपान्त्यपूर्व फेरीत पंजाब वरील विजयात ईश्वरीने 76 धावा करत महाराष्ट्र संघाला 6 गडी राखून विजयी करण्यात मोठी कामगिरी केली. या सामन्यात नाशिकच्या शाल्मली क्षत्रियने देखील आपल्या जलदगती गोलंदाजीची चुणूक दाखवत पंजाबचे 3 गडी बाद केले. आणि महत्वाचे म्हणजे असून उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपान्त्यपूर्व फेरीत दिल्लीशी 19 डिसेंबरला पुदूचेरी येथे लढत नियोजित आहे. याही सामन्यातील याचप्रमाणे कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
आधी डेहराडून येथे खेळलेल्या साखळी स्पर्धेत या स्पर्धेत 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत ईश्वरी सावकारने विजयी सुरुवात केली, महाराष्ट्र संघाने अरुणाचल व पॉंडेचरी पाठोपाठ गोवा व विदर्भ संघावरही विजय मिळवला. फक्त मध्य प्रदेश विरुद्ध हा संघ पराभूत झाला. ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात पांच सामन्यात चार विजय मिळवले व संघाला उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. तिच्या या कामगिरीमुळे क्रिकेट क्षेत्रात नाशिकचे नाव उंचावले गेले आहे तिचे सर्वत्र विशेष अभिनंदन करण्यात येत आहे
ईश्वरी सावकारच्या या दिमाखदार कामगिरीने नाशिक क्रिकेट वर्तुळात अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. ईश्वरीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींसह पदाधिकाऱ्यांनी ईश्वरी सावकारला शाबासकी देत खास अभिनंदन करून उपान्त्यपूर्व सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.