आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या राष्ट्रीय पातळीवरील मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटातील शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड झाली आहे. माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए येथे भारतभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी 1 ऑगस्टपासून महिनाभराचे हे शिबीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय 19 वर्षांखालील वयोगटात संभाव्य निवडक गुणी खेळाडूंना 2023 साली साऊथ आफ्रिकेत होणार्या पहिल्या विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करत आहे.
ईश्वरी सावकारची यापूर्वी मे-जून मधील राजकोट येथे झालेल्या शिबीरासाठी निवड झाली होती. या शिबिरातून बीसीसीआयने सहा संघ तयार केले होते. त्यांच्यात विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतक व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक 509 धावा केल्या. याबरोबरच गेल्या हंगामातील विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे या अतिशय महत्वाच्या हाय परफॉर्मन्स शिबिरासाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
सलामीवीर ईश्वरी सावकारने 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरुद्ध 86 तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज 73 धावा असे, जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये जयपूर येथे खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीच्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
पुढील वाटचालीस शुभेच्छा
या जोरावर ईश्वरीची एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-20 सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती. या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.