आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयच्या विजय मर्चंट स्पर्धा:महाराष्ट्र संघाकडून साहिल पारखच्या नाबाद 224 धावा; सिक्कीम संघाला चारली धूळ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या डावखुऱ्या सलामीवीर साहिल पारखने बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात नाबाद २२४ धावांचे योगदान दिले. त्याच्या या कामगिरीने नाशिकचे नाव पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रात उंचावले गेले असून त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सुरत येथे खेळल्या जात असलेल्या बीसीसीआयच्या विजय मर्चंट ट्रॉफीत साहिल पारखने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तुफान फटकेबाजी करत नाबाद २२४ धावा केल्या. या कामगिरीतून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून सिक्कीमला प्रथम फलंदाजी देत त्यांचा पहिला डाव केवळ ७२ धावांत गुंडाळला. उत्तरादाखल सलामीवीर साहिल पारखच्या नाबाद २२४ धावांच्या जोरावर महाराष्ट्र संघाने २ बाद ३५१ धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या डावातहि सिक्कीमला परत ५७ धावांत बाद करत महाराष्ट्र संघाने एक डाव व २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

या बी सी सी आय च्या स्पर्धेत नाशिकच्या साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा या दोघांनीहि महाराष्ट्र संघातर्फे फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र संघाच्या वाटचालीत या दोघांच्या महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे या कामगिरीमुळे अनेक खेळाडूंना नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे महाराष्ट्र संघाचा पुढील साखळी सामना आसाम बरोबर २१ डिसेंबरला होणार आहे. आगामी सामन्यात साहिल याचप्रमाणे कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

साहिल पारख या उदयोन्मुख कुमार क्रिकेट खेळाडूच्या धमाकेदार कामगिरी बद्दल , सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी साहिल पारख ला शाबासकी देत, खास अभिनंदन करून पुढील अशाच जोरदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...