आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड यादी:बीडीएस अभ्यासक्रमाच्या अखेरच्या फेरीचे प्रवेश सुुरू ; प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमबीबीएस, बीएमएमएस आणि बीएचएमएस या शाखांसोबत बीडीएस अर्थातच दंतशल्य चिकित्सक या अभ्यासक्रमाच्या अखेरच्या फेरीचे प्रवेश सुरू आहेत. संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी स्टेट सीईटीमार्फत पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत समाविष्ट करण्यात आलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. २१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी नीट परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. राज्यातून एकूण २ लाख ४४ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख १३ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश मिळवले. संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी स्टेट सीईटीमार्फत पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे.

या यादीत समाविष्ट करण्यात आलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. या प्रक्रियेअंतर्गत काॅलेजमध्ये अर्ज करण्याची मुदत १९ व २० डिसेंबर अशी असेल. तर गुणवत्ता यादी, निवड यादी व प्रतीक्षा यादी २० डिसेंबरला प्रसिद्ध होईल. प्रथम निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत संधी असेल. त्यानंतर रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होईल.

अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी शेवटी जाहीर केली जाईल. सध्याच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एमबीबीएस, बीएएमएस या शाखांसोबत दंतशल्य चिकित्सक या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटल धामणगाव आणि एसएमबीटी डेंटल कॉलेज व हॉस्पिटल संगमनेर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...