आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाख रुपये खर्च:अशाेकस्तंभाचे सुशाेभीकरण; स्वातंत्र्य महोत्सव

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून शहरातील अशोकस्तंभ आणि भाेवतालच्या जागेचे सुशोभीकरण करण्यात येत असून १५ ऑगस्ट राेजी हे शिल्प नागरिकांसाठी खुले हाेणार आहे.

महापालिकेकडून हे १५ लाख रुपये खर्चाचे काम सामाजिक दायित्वातून बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने केले जात आहे. अशोकस्तंभ चौकांचे रुपडे पालटणार असल्याने शहरवासीयांनीही आनंद व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कल्पनेवर सुशोभीकरण साकारण्यात येत आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्णत्वास येत आहे. दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी मदत व पुढील १० वर्षांसाठी देखभालीची जबाबदारीही स्वीकारली आहे.

बातम्या आणखी आहेत...