विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात:पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व; विजयी खेळाडूंची राज्यस्तरावर होणार निवड
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात गुरुवारपासून नाशिक विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धकांना सुरुवात झाली. या स्पर्धेत नाशिक मनपा, जळगाव मनपा, धुळे मनपा, मालेगाव मनपा यासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजय खेळाडूंची राज्यस्तरावर निवड होणार आहे.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, रावसाहेब जाधव, महेश थेटे, संदीप फुगट, संदीप भगरे, अमोल जोशी, अविनाश कदम, सुरेश काकड, प्रभाकर सूर्यवंशी, अशोक जाधव परिश्रम घेत आहेत. शुक्रवारी 19 वर्षाआतील तर शनिवारी 14 वर्षाआतील स्पर्धा होणार आहे.
17 वर्षाआतील विजयी खेळाडू असे
1500 मीटर
- मुले : प्रविण चौधरी (नाशिक), गोविंद पाडेकर (नाशिक)
- मुली : शकिला वसावे (शिरपूर), आरोही देशमुख (नाशिक)
100 मीटर
- मुले : करण वाघ (भडगाव), भारत पावरा (शिरपूर)
- मुली : अभिलाशा मोरे (नाशिक), जान्हवी खैरनार (नाशिक)
200 मीटर
- मुले : कृतार्थ चित्ते (नाशिक), करण वाघ (भडगाव)
- मुली : अभिलाशा मोरे (नाशिक), संस्कृती जाधव (नाशिक)
400 मीटर
- मुले : अर्णव खैरनार (नाशिक), कृतार्थ चित्ते (नाशिक)
- मुली : स्मितल मोरे (नाशिक), आरोही देशमुख (नाशिक),
800 मीटर
- मुले : वेदात चव्हाण (त्र्यंबकेश्वर), अथर्व खैरे (नाशिक)
- मुली : स्मितल मोरे (नाशिक), रिया पावरा (शिरपूर),
100 मीटर हर्डल्स
- मुली : जान्हवी खैरनार (नाशिक), साक्षी बच्छाव (मालेगाव)
110 मीटर हर्डल्स
- मुले : जहीर शेख (मालेगाव), रामप्रसाद ठोंबरे (येवला)
400 मीटर हर्डल्स
- मुले : ज्ञानेश्वर वळी (नाशिक), आदित्य धोंडगे (सटाणा)
- मुली : अभिलाशा मोरे (नाशिक), तेजल पाटील (नाशिक)
5 किमी चालणे
- मुले : कार्तिक देशमुख (नाशिक), सुनिल खलाणे (शहादा)
3000 मीटर
- मुले : प्रविण चौधरी (नाशिक), नीलेश वसावे (अक्कलकुवा)
- मुली : शकिला वसावे (शिरपूर), वंदना तुंबडे (त्र्यंबकेश्वर)
4×100 रिले
- मुले : चिंतामण चौधरी, चेतन चौधरी, कल्पेश सहारे, हेमंत गवळी (अलंगुण)
- मुली : हर्षदा सोनवणे, कावेरी औटे, ईश्वरी शिंदे, राधिका बच्छाव (लासलगाव)
4×400 रिले
- मुले : प्रवीण चौधरी, सचिन वळवी, ज्ञानेश्वर वळी, गोविंद पाडेकर (नाशिक)
- मुली : मनिषा दुंदे, संगिता सापटे, योगिता सापटे, रविना राऊत (पेठ)
लांबउडी
- मुले : भूषण शिंदे (निफाड), स्मित चौरे (नाशिक)
- मुली : संस्कृती जाधव (नाशिक), हर्षदा सोनवणे (लासलगाव)