आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला इ-छावणी प्रकल्पाची अंमलबजावणी केली म्हणून नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गाैरविण्यात आले. नागरिकांना ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून अनेक सुविधा बाेर्डाने उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन वर्षांत २१ हजार नागरिकांनी इ-छावणी अंतर्गत नोंदणी केली आहे. तर सुमारे ६२ हजार नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे प्रदान केलेल्या सेवांचा लाभ घेतला आहे. याच कामाची पावती म्हणून देवळाली छावणी परिषदेचा विशेष सन्मान झाला.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राहुल गजभिये यांनी शुक्रवारी (दि. १६) नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स इस्टेट मॅनेजमेंट (एनआयडीइएम) संस्थेच्या सभागृहात ‘रक्षामंत्री अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स - २०२२’ कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला. यावेळी देवळाली छावणी कार्यालयातील संगणक सहायक श्रीनिवास सहस्त्रभोजने, संगणक प्रोग्रामर प्रियंका खेमनार उपास्थित होते.
गेल्या दोन वर्षांत कॅन्टोन्मेंट बोर्डाने ऑनलाइन पेमेंटद्वारे १० कोटी रुपये विविध करापाेटी जमा केले आहेत, एक लाख जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केली आहे, २२६० तक्रारींचे निराकरण केले आहे.
देशभरातील छावण्या इ-छावणी प्रकल्प गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देशातील सर्व छावण्यांमध्ये सुरू करण्यात आला होता, ज्यामुळे नागरिकांना विविध सेवांचा ऑनलाइन लाभ घेता येतो. नवीन प्रणाली स्वीकारणे सुरुवातीला गोष्टी कठीण होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.