आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन फसवणूक:मोबाईलवर सिम कार्ड लॉक झाले असा मॅसेज आला तर सावध व्हा, वकिलाला घातला 1 लाखांचा गंडा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सीम कार्ड लाॅक झाला असा मेसेज आला तर सावध व्हा. अशाच प्रकारे एका वकिलाला व्हाट्सअ‌ॅपवर मेसेज आला. त्यांना अ‌ॅप इंस्टाॅल करण्यास सांगून बँक खाते हॅक करत बँकेतून ऑनलाईन 99 हजार 999 रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार शनिवार दि. 4 रोजी कालिका सोसायटी कालिका मंदीर जुना आग्रारोड येथे उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित मोबाईलधारकाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अ‌ॅड. नामदेव गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरी असतांना मोबाईलवर सकाळी 9.30 वाजता डिअर कस्टमर तुमचे केवायसी बंद करण्यात आले असून तुमचे सीम कार्ड 24 तासांच ब्लाॅक केले जाईल. तुम्ही ग्राहक केंद्राशी संपर्क साधा, असा मेसेज आला. त्यावर ग्राहक केंद्राचा नंबर होता. अ‌ॅड गिते यांनी काॅल केला असता संशयितांने प्ले स्टोरमध्ये जाऊन रिचार्ज क्युब अ‌प इंस्टाॅल करण्यास सांगीतले. अ‌ॅड. गिते यांनी अ‌ॅप इंस्टाॅल केल्यानंतर पुन्हा केवायसी क्वीक सपोर्ट हे अ‌ॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

दोन्ही अ‌ॅप्लीकेशन डाऊनलोड करत असतांना फोनवर बोलणे सुरु होते. यावेळेत संशयिताने बँकेचे सर्व डिटेल घेऊन 9.30 ते 10.57 यावेळेत एसबीआय बँकेच्या सेव्हिंग खात्यातून सुरवातीला 10 रुपये, नंतर 49 हजार, आणि 24990, 25 हजार अशी 99 हजार 999 रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेत फसवणूक केली. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...