आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:काही ना काही अडचणी आणण्याचेराज्य सरकारचे धंदे : राज्यपाल, नाशकातील कार्यक्रमात आघाडी सरकारवर घणाघात

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव भिंत घर येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण आणि जनकल्याण गोशाळेचे उद्घाटन

या सरकारमध्ये काहीतरी गडबड असून काही ना काही अडचणी आणण्याचे धंदेच या सरकारमध्ये सुरू आहेत, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव भिंत घर येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण आणि जनकल्याण गोशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोलताना राज्यपालांनी टीकेची झोड उठवली.

मी छत्तीसगड, गुजरात, झारखंडमध्ये फिरलो. आमच्या उत्तराखंडमध्ये तर मोठमोठे पर्वत आहेत. तेथेही आपल्यासारखेच आदिवासी राहतात. पण तेथील लोक आम्ही प्रयत्न केल्याने पुढे गेले. इथे मुंबईसारख्या शहरापासून १०० किमी अंतरावरील पालघरमध्येही वाईट स्थिती आहे. अत्यंत विदारक चित्र आहे. अहो, आदिवासी शाळांमध्ये हे शिक्षक देऊ शकले नाहीत. कविता राऊतसारख्या आंतरराष्ट्रीय धावपटूला क्रीडा खात्यात नोकरी देण्यास राज्यपालांनी सांगितल्यावर क्रीडामंत्र्यांनी होकार तर दिला, मात्र नोकरी दिली नाही. या सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे. त्यामुळे माझं कविताला सांगणं आहे की थोडा धीर धर, नोकरी मिळेल. थोडा वेळ लागेल. कारण काही ना काही अडचणी आणण्याचे धंदेच या सरकारमध्ये सुरू आहेत, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी नृत्यांद्वारे राज्यपालांचे स्वागत करण्यात आले.