आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:भगवद‌्गीता हेच ब्रह्मशास्र; त्याचे पूर्णपणे अनुसरण करा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवद‌्गीता हेच ब्रह्मशास्र, त्याचे अनुसरण करा, असे प्रतिपादन अ. भा. महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकर शास्त्री यांनी केले. गिरणारे येथे श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. येथील एकमुखी दत्त मंदिराचा १५ वा वर्धापन व मराठी भाषेच्या आद्य कवयित्री महदंबा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी लक्ष्मी लॉन्स येथील सभागृहात महानुभाव संप्रदायातील संत-महंतांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली. याप्रसंगी सुकेणेकर शास्त्री बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, अपार श्रद्धा व भक्ती असली की आपल्याला देव भेटतो, त्यासाठी आत्मप्रचिती हवी, मात्र आत्मप्रचिती गुरुशिवाय शक्य नाही. व्यासपीठावर गोपीराज बाबा शास्त्री, श्रीधरानंद शास्त्री, महंत चक्रपाणीबाबा कोठी, विशाल महाराज कोठी, दादेराज बाबा आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...