आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तीची प्रतिष्ठापना:भगवान परशुरामकुंड आमंत्रण रथयात्रा मंगळवारी नाशिकमध्ये

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवरील भगवान परशुरामकुंड या तीर्थस्थळावर विप्र फाउंडेशन या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने पंचधातूची ५१ फूट उंच श्री भगवान परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त भगवान परशुरामकुंड आमंत्रण यात्रेला ८ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे आगमन मंगळवारी (दि. २२) दुपारी ३ वाजता नाशिकमध्ये हाेईल.

या यात्रेतील अमृत रथाची विशेष शोभायात्रा काळाराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, येथून दुपारी ४ वाजता निघेल. सरदार चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा ते बालाजी संस्थान, तेली गल्ली येथे संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल. महंत स्वामी चिरंजीवी रामनारायणदासजी द्वारा तीर्थक्षेत्र महात्म्य, आशीर्वादपर प्रवचन, आमंत्रण यात्रेची माहिती व सत्कार करण्यात येऊन समारोप होईल. रामकुंडावर पुरोहित संघाद्वारे गंगापूजन होईल. या यात्रेत नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्यामसुंदर जोशी, पवन जोशी, नंदकिशोर पंचारिया, हितेंद्र शर्मा, भरत दाधिच, किरण बद्दर, विशाल जोशी, ओमप्रकाश शर्मा, अशोक शर्मा यांनी केले आहे.

भगवान परशुरामकुंड महातीर्थावर येण्याचे आमंत्रण देण्यासाठी कांची कामकोटी येथून जयपूरपर्यंत ही आमंत्रण यात्रा निघाली असून जगद‌्गुरू श्री शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेऊन या यात्रेचा ‘अमृत भारत रथ” ८ नोव्हेंबरला निघाला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, येवलामार्गे नाशिक येथे २२ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता यात्रेचे नाशिकमध्ये आगमन हाेईल.

बातम्या आणखी आहेत...