आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्ण मंदिर भजन-कीर्तनासह विविध कार्यक्रमांनी रंगले:भजन-कीर्तनासह रंगला कृष्णजन्म साेहळा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गुरुवारी (दि. १८) श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा शहरातील कृष्ण मंदिरांत भजन-कीर्तनासह विविध कार्यक्रमांनी रंगला. मध्यरात्री मंत्रोच्चारात व जयघोषात गुरुवारी मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा करण्यात आला शहरातील श्रीकृष्ण मंदिरात गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोहळ्यानिमित्त शहरातील कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीनिमित्त सकाळी ८ वाजेपासून पंचसूक्त पवमान अभिषेक करण्यात आला. श्रींना गुरुवारी ‘राजा’चा साज चढविण्यात आला होता. कृष्णनगर येथील मंदिरात श्रींचा महाभिषेक सोहळा, महाआरती करण्यात आली.

मंत्राेच्चार व श्रीकृष्णाचा जयघोष करत गुरुवारी मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला. यानिमित्त करण्यात आलेली फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात कायम होती.इस्कॉन मंदिरात आज जन्माष्टमी सोहळा इस्कॉन मंदिरात शुक्रवारी जन्माष्टमी सोहळा रंगणार असून यानिमित्त मंदिरात विशेष सजावट केली आहे. दिवसभर भजन-कीर्तनसह रात्री बारा वाजता जन्म सोहळा होणार आहे त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

दहीहंडीचा थरार आज रंगणार
कोरोनाचे निर्बंध हटल्याने आज शहरात दहीहंडीच्या थरार रंगणार आहे. काठे गल्ली, पंचवटी व इंदिरानगरला आज दहीहंडीचा कार्यक्रम आयोजिला आहे.

बातम्या आणखी आहेत...