आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भाेंदूबाबाचा महिलेवर बलात्कार;5 लाख रुपये उकळत जीवे मारण्याची धमकी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत एका भाेंदू बाबाने महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने घरी बाेलावले. जडीबुटीचे अौषध देण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेला घर घेऊन देण्यासाठी या भोंदूबाबाने पाच लाख रुपये घेत तिला ब्लॅकमेल करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संशयित भोंदू बाबा विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देव बाबा, त्याची पत्नी व मुला-मुलीच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ पासून नाशिकराेड येथील जयाबाई काॅलनीत राहणाऱ्या संशयित विष्णू वारुंगसे ऊर्फ देव बाबा याच्या संपर्कात आहे.

घरी पतीसोबत पटत नसल्याने देव बाबा जडीबुटी देत घरातील पीडा दूर करतो असे कुणीतरी सांगितले हाेते. या माहितीच्या अधारे पीडिता या बाबाकडे आली होती. देवबाबाने पीडितेच्या सर्व समस्या एकून घेत तिला धीर देत नाशिकरोड परिसरात भाडेकरारावर खोली घेऊन दिली. तेथे पूजा करण्याचा बहाणा करत बाबाने पीडितेवर बलात्कार केला. महिलेने नकार दिला असता तिला घर घेऊन देण्याचे आमिष दिले व तिच्याकडून ५ लाख रुपये घेतले. पीडितेने बाबाकडे घर द्या नाही तर पैसे तरी परत द्या, अशी मागणी केली असता बाबाने महिलेस ब्लॅकमेल केले.

अॅट्राॅसिटीचा गुन्हा
संशयित भोंदू बाबाने महिलेला जातीवाचाक शिवीगाळ करत तीला धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे संशयितांच्या विरोधात अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...