आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफैजाने औलिया फाउंडेशन व लोकनिर्णय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईनाका परिसरातील भारतनगर या भागात पंचायत केंद्र (कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर ) सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच मशिदीचे अध्यक्ष हाजी अनीस पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहत फाऊंडेशनचे सचिव तथा ज्येष्ठ समाजसेवक आसिफ शेख होते.
संविधानचे प्रसार आणि प्रचार करणे, लोकसहभागातून परीसराचा सर्वांगीण विकास करणे, महिलांवरील हिंसाचारास प्रतिबंध व धार्मिक सलोखा संवर्धन करून सरकारी आरोग्य यंत्रणा व जनता समन्वय यांच्यात समन्वय निर्माण करून गरजूंना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी तसेच विविध अडचणी सोडवण्यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रयत्न होणार आहे.
यावेळी उपस्थितांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर फैजाने औलिया मशिदीचे इमाम उपस्थित होते.यावेळी शेख रियाजुद्दीन, हाजी अब्दुल रज्जाक, अब्दुल गफ्फार पंजा, सादिक पटेल, फैज बँकेचे चेअरमन शेख फारुक हुसेन, व्हाइस चेअरमन ड. अन्सार सय्यद, संचालक सोहील काजी, हाजी अय्युब शेख असलम खान, आसिफ सय्यद, शकील शेख, अब्दुल गणी शेख, अकिल खान, फारूक मंसुरी, हमिद खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. फैजाने ऑलिया फाउंंडेशनचे सचिव ड. नाजीम काझी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सूत्रसंचालन केले तसेच सर्वांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.