आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:शेळ्या चारणाऱ्या वृद्धेवर भरदुपारी बिबट्याचा हल्ला

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने गावागावांत बिबटे आढळून येत आहेत. शनिवारी (दि. १०) मनोली गावात दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेळ्या चारत असताना वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला.

या वृद्धेच्या मानेला जखम झाली असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी याबाबत सांगितले की, मनोली गावात इंदूबाई मुरलीधर गभाले (५२) या आढाव यांच्या द्राक्ष आणि टोमॅटोच्या क्षेत्रात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेळ्या चारत होत्या. यावेळी एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या मानेला जखम झाली असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...