आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नार -पार गिरणा नदीजोड योजना (ता. सुरगाणा जि. नाशिक) प्रस्तावित असुन यात नार पार औरंगा व आंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमीकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वात व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नार -पार गिरणा नदीजोड प्रकल्प पुर्ण होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार प्रयत्नशील असुन पाठपुरावा करीत आहेत. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितटीच्या गिरणा उपखोऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे.
एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार, पार, औरंगा व आंबिका या पश्चिमी वाहिनी नदी खोऱ्यातील ३०४.६ दलघमी पाणी नार- पार- गिरणा नदीजोड योजनेमुळे वळविण्याचे नमूद आहे. यासाठी साधारणतः आठ हजार कोटीचा निधी राज्य शासन खर्च करणार असून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे.
नाशिक जिल्हयात या योजनेद्वारे सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी तसेच वहन व्यय साठी एकुण १४९.८३ दलघमी पाणी वळविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव व सटाणा हे दोन्ही तालुके टंचाईग्रस्त तालुके असुन येथे नियमित पिण्याच्या व सिंचनाच्या समस्या भेडसावत असल्याने या दोन्ही तालुक्यांचा डिपीआर मध्ये समावेश झाल्यास येथील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असल्याचे सदर पत्रात नमुद केले आहे.
नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदगांव व सटाणा तालुक्याचा डिपीआर मध्ये समावेश करण्याबाबत नांदगांव व सटाणा तालुक्यातील स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्या आग्रही मागणी विचारात घेवून काल सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मूंबई येथील झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी निवेदन दिले असता यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे डॅा. पवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.