आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भाच्या कर्करोगाची तपासणीच्या अद्ययावत यंत्राचे लोकार्पण:राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्याकडून आशा सेविकांचा गौरव

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये महिलांमधील स्तनांचा कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठीच्या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. जेनवर्क फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अद्ययावत यंत्राचे लोकापर्ण केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 15 मार्च पर्यंत जिल्ह्यात महिला आरोग्य तपासणी शिबीर राबवले जाणार आहे.

मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक कामावर आधारित मोबदला प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांचा गौरव डाॅ.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेत आयाेजित कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते उपस्थित होते.

आराेग्य सेवेचा पायाभुत घटक

डॉ पवार म्हणाल्या, आरोग्यासंबधी कुठलीही योजना राबवायची असेल तर या योजनेचा पायाभूत घटक हा आमच्या आशा सेविका असतात. आरोग्य व्यवस्थेतले आशा सेविकांचे योगदान हे अनन्य साधारण असून त्या आराेग्य सेवेचा कणा असतात.

अंधश्रध्दा निर्मुलनावर नाटीका

धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिकेचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैद्यकीय उपचार घ्यावे असा संदेश या नाटिकेतून देण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या नाटिकेबद्दल आशा सेविकांचे कौतुक केले

आशा सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटीका सादर केली
आशा सेविकांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटीका सादर केली
बातम्या आणखी आहेत...