आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:नाशकात भाेंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत एका भाेंदूबाबाने महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने घरी बाेलावले. जडीबुटीचे अौषध देण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेला घर घेऊन देण्यासाठी या भोंदू बाबाने ५ लाख रुपये घेत तिला ब्लॅकमेल करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित भोंदू बाबा विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देव बाबा, त्याची पत्नी व मुलामुलीच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१८ पासून महिला देव बाबा याच्या संपर्कात हाेती. घरी पतीसोबत पटत नसल्याने देव बाबा जडीबुटी देत घरातील पीडा दूर करतो असे कुणीतरी सांगितले हाेते. यामुळे पीडिता बाबाकडे आली होती. बाबाने पीडितेच्या सर्व समस्या एकून घेत तिला धीर देत नाशिकरोड परिसरात भाडेकरारावर खोली घेऊन दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

बातम्या आणखी आहेत...