आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी‎ निवड:सातपूरला यंदाही एकत्रित भीम महाेत्सव‎

सातपूर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर शहर एकत्रित भीम‎ महोत्सव समितीची कार्यकारिणी‎ निवडण्यात आली असून‎ अध्यक्षपदी हर्षल काळे,‎ उपाध्यक्षपदी प्रशांत जगताप,‎ कार्याध्यक्षपदी सत्यवान चक्रे तर‎ खजिनदारपदी पंडित नेटावटे यांची‎ सर्वानुमते निवड करण्यात आली‎ असल्याची माहिती माजी‎ नगरसेवक सलीम शेख यांनी‎ पत्रकार परिषदेत दिली.‎ मागील वर्षांपासून सातपूर‎ शहरातील सर्व जातीधर्मातील व‎ सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते‎ यांना एकत्रित करून भीम‎ महोत्सव साजरा करण्याचा पायंडा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाडण्यात आला.

सातपूर प्रभागाचे‎ माजी सभापती रवींद्र धिवरे यांच्या‎ अध्यक्षतेखाली व कोर कमिटीच्या‎ मार्गदर्शनाखाली भीम महोत्सव‎ समितीच्या बैठकीत कार्यकारीणी‎ निवडण्यात आली. बैठकीस‎ महापालिकेचे माजी सभागृहनेते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिनकर पाटील यांच्यासह अरुण‎ काळे, योगेश गांगुर्डे, वसंत पंडित,‎ नितीन निगळ, काळू काळे, विजय‎ अहिरे, अविनाश पगारे, प्रतीक‎ पगारे, बिपीन कटारे, सतीश काळे,‎ पवन दोंदे, शिवाजी काळे, भारत‎ भालेराव आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...