आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिन:भोलेनाथ भजनी मंडळाच्या वर्धापनदिनी शुक्रवारी लोककलावंतांचा मेळावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त व मंडळाचे आद्य संस्थापक वै. पोपटसिंह परदेशी यांचा ४१ वा स्मृतिदिन तसेच मंडळाचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भूषण लोकशाहीर माजी नगरसेवक कै. प्रतापसिंग परदेशी यांचा ४४ वा स्मृतिदिन व भारुडरत्न वै. निरंजन भाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व लोककलावंतांचा मेळावा शुक्रवारी (दि. २३) श्रीराम मंदिर, बालाजी कोट, संत गाडगे महाराज पुलाजवळ, गंगाघाट येथे आयाेजित करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजता सनईवादनाने कार्यक्रमाला सुरुवात हाेईल. सकाळी ११ वाजता लोकशाहीर विजय भोळे यांचे पोवाडा व लोकगीत होईल. त्यानंतर लोककलावंतांचा मेळावा, दुपारी शहरातील भजनी लोककलावंतांचा भजनाचा कार्यक्रम हाेणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण व दारूबंदी खाते, पुणेचे माजी सहसंचालक गं. पां. माने, संत धाम अंजनेरीचे महंत संपत महाराज धोंडगे, शाहीर शानूबाई सय्यद, अ. भा. मराठी शाहीर परिषदेचे माजी अध्यक्ष लोकशाहीर विजय भोळे यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील लोककलावंतांची माेठी उपस्थिती कार्यक्रमाला असेल, अशी माहिती राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथसिंग परदेशी, अविनाश कडवे आदी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...