आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:उपाय करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा युवतीसह आई, दोन बहिणींवर अत्याचार; लग्न होत नसल्याने उपायासाठी गेली तरुणी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह जमत नसल्याने भोंदूबाबाकडे गेलेल्या पीडित युवतीला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे अौषध देत तिच्यावर अत्याचार करून पीडितेचे नको ते फोटो मोबाइलमध्ये काढले. तसेच तिच्यासह आई आणि दोन बहिणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार येवला शहरात उघडकीस आला.

हा सर्व प्रकार मिटवण्यासाठी भोंदूबाबाच्या वकील भावाने पीडित युवतीच्या आईकडून वेळोवेळी ८ लाखांचा खंडणी घेतली. याप्रकरणी येवला पोलिसांनी संशयित भोंदूबाबा सुफी अब्दुल अजीज बाबा आणि त्याचा भाऊ अॅड. जब्बार शेख (दोघे रा. नागडे, ता. येवला) यांच्या विरोधात बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, कट रचणे आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पीडित २५ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, १७ एप्रिल २०१९ ते ३ आॅगस्ट २०२१ या कालावधीत युवती परिचयातील अजीजबाबा याच्याकडे लग्न जमत नसल्याने गेली होती. अजीज भोंदूबाबाने तिच्यावर जादूटोणा झाला आहे. त्याचा तोड काढावा लागेल नाही तर लग्न होणार नाही, असे सांगत पीडितेला गुलाबपाणी पिण्यास देत त्यात गुंगीचे अौषध टाकले. शुद्ध हरपल्यानंतर संशयित बाबाने युवतीवर अत्याचार केले. आई व बहिणींवरही अत्याचार केले.

भोंदूबाबाच्या विरोधात आणखी तक्रारीची शक्यता
संशयित भोंदू बाबाच्या विरोधात आणखी तक्रारी असण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध संशयित महिलांचा छळ करत होता. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांत तक्रार द्यावी सचिन पाटील, पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...