आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सैन्यात तरुणांचा सहभाग:भोंसला ने दिले सैन्याला ५०० अधिकारी ; जवान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्यात तरुणांचा सहभाग वाढावा या प्रमुख उद्देशाने १९३७ साली डाॅ. बाळकृष्ण मुंजे यांनी स्थापलेल्या भोंसला मिलिटरी स्कूलने आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक अधिकारी आणि जवान भारतीय सेनेला दिले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी १०५० विद्यार्थी सैनिकी शिक्षण घेत असून यात तब्बल ३०० मुलींचाही समावेश आहे.

भोंसला स्कूलने गत ८५ वर्षांच्या कालखंडात देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेत सध्या १०५० विद्यार्थी सैनिकी शिक्षण घेत आहे. तसेच १५० काॅलेज विद्यार्थी निवासी आणि बिगर निवासी शिक्षण घेत असल्याचे संस्थेचे सहकार्यवाह डाॅ. दिलीप बेलगावकर यांनी स्पष्ट केलं. गुरुवारी (दि. १) संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अॅथलेटिक्समध्येही १०० पेक्षा अधिक सुवर्ण
आतापर्यंत भोंसला मिलिटरी स्कूलच्या १०० पेक्षा अधिक खेळाडूंनी अॅ‌थलेटिक्समध्ये राष्ट्रीय-आंतराष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदके पटकावली आहेत. संस्थेतर्फे साहसी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे दिलीप बेलगावकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...