आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशकातील ‘भुजबळ फार्म’ बनले राज्याचे अन्न मंत्रालय; घरातच कंट्राेल रूम

नाशिक3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मंत्री भुजबळ आपल्या घरातून राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. - Divya Marathi
मंत्री भुजबळ आपल्या घरातून राज्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत.
  • मंत्री भुजबळांसाेबत स्टाफसह माजी खासदार, अामदारही करत आहेत मदत

भूषण महाले

कधीकाळी वादाच्या भाेवऱ्यात असलेले नाशिकचे ‘भुजबळ फार्म’ सद्य:स्थितीत कोराेनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अन्न मंत्रालय बनल्याचे चित्र असून लाॅकडाऊननंतर महाराष्ट्रातील ७ काेटी लाभार्थींपर्यंत ५२ हजार स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य पुरवण्याची कसरत या ठिकाणावरून सुरू अाहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी घरालाच कार्यालय करून या ठिकाणी पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ व पुत्र तथा माजी अामदार पंकज भुजबळ यांच्यासह कर्मचारी वर्गाच्या मदतीने धान्य वाटपाचे नियाेजन, त्यावर नियंत्रण अाणि साेशल मीडियातून येणाऱ्या तक्रारींवर कारवाईसाठी दिवसरात्र एक केल्याचे चित्र अाहे.

देशभरातील लाॅकडाऊननंतर मंत्रालयातील कामकाजही थांबले अाहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घर व मंत्रालयातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून अाहेत. अाराेग्यमंत्री राजेश टाेपे हे फील्डवर अाहेत. या सर्वांनंतर तिसरे महत्त्वाचे खाते ज्यांच्याकडे अाहे ते भुजबळ यांनी घरालाच कंट्राेल रूममध्ये परावर्तित केले अाहे.  नाशिकच्या गाेविंदनगर परिसरात जेथे कोराेनाचा दुसरा रुग्ण सापडला त्या भागात भुजबळ फार्म हे त्यांचे खासगी निवासस्थान अाहे. 

सद्य:स्थितीत हे क्षेत्र प्रतिबंधित असून अत्यावश्यक

दाेन ते अडीच वर्षांपूर्वी नानाविध अाराेपांमुळे जे भुजबळ फार्म हे वादात हाेते. तेथूनच अाज महाराष्ट्राचे अन्न मंत्रालय सुरू अाहे. भुजबळ सकाळी अाठ वाजेपासून घरातच माेबाइल, दाेन स्वीय सहायक, एक टायपिस्ट, एक साेशल मीडिया व ई-मेल पाठवणाऱ्याच्या मदतीने कामकाज सुरू करतात. कामकाज रात्री उशिरा संपते.  राज्यातील ५५ हजार दुकानांमार्फत लाभार्थींना धान्य मिळते का ? अाॅनलाइन क्रमांकावर अालेल्या तक्रारी वाचून त्यातील गांभीर्य लक्षात घेत तेथील माहिती घेण्यात येते.

तांदळाचा १७ एप्रिलपर्यंत सर्वांना पुरवठा

  • रेशनवर केशरी, पिवळ्या १ काेटी ६० लाख कार्वंर ७ काेटी जनतेला पुरेल इतके महिन्याचे धान्य पुरवले जात अाहे.
  • याव्यतिरिक्त, केंद्र शासनाच्या माेफत तांदळाचा पुरवठाही १७
  • एप्रिलपर्यंत सर्वांना हाेईल. थाेडक्यात, दाेन महिन्यांचे धान्य एकाच वेळी दिले अाहे.
  • ५ रुपयांत शिवभाेजन थाळी दिली जात अाहे. काही ठिकाणी परिस्थिती बघून हे ५ रुपये न घेता माेफत.

पॅनिक हाेऊ नका; परिस्थिती समजून घ्या..

कोराेनामुळे प्रचंड उलथापालथ सुरू अाहे. ७ काेटी लाेकांना धान्य पुरवण्याची  कसरत सुरू अाहे. सर्वांना धान्य दिले जाईल.  रेशन दुकानदार हेही अन्नसैनिक अाहेत. कुणी चुकत असेल तर तक्रार केली की कारवाई हाेत अाहे.  जे चांगले काम करीत अाहेत, त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. ही लढाई िजंकायची असून लाेकांनी पॅनिक न हाेता परिस्थिती समजून सहकार्य करावे.  -छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री 

बातम्या आणखी आहेत...