आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:नमामि गोदा, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पाचे आज भूमिपूजन; केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या आयटी पार्क परिषदेनंतर आता रविवारी (दि. १३) दोन हजार कोटींच्या नमामि गोदा आणि लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि नाशिकचे प्रभारी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. गोदाकाठी रामकुंडावर हा सोहळा होणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

यासोबतच देशभरातील येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना शहरातील पर्यटन तसेच धार्मिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी दोन मार्गदर्शन केंद्रही सुरू केले जाणार आहे. एक मार्चला शहरात आयटी पार्कसाठी परिषद घेण्यात आली. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर मंजूर केलेल्या नमामि गोदा या प्रकल्पाचेही भूमिपूजन केले जाणार आहे. यासोबतच आडगाव येथे होणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचेही भूमिपूजन रविवारी केले जाणार आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नमामि गोदा प्रकल्पास दिलेल्या मान्यतेनुसार नियोजित नमामि गोदा प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे कामांचा श्रीगणेशा होणार आहे. रावसाहेव दानवे यांच्यासह गिरीश महाजन, सहप्रभारी जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...