आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता शिवनई येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री छगन भुजबळ हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
नाशिक उपकेंद्रासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले असून त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नाशिकसह अहमदनगर येथील उपकेंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
विशेष पथकाकडून जागेची पाहणी
१७ मे रोजी महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या दिवशीच हा भूमिपूजन सोहळा होणार होता. मात्र पालकमंत्री भुजबळ हे त्यावेळी नसल्याने हा कार्यक्रम झाला नाही. त्याच दिवशी मंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत उपकेंद्राचे भूमिपूजन होईल, असे जाहीर केले होते. आता महिन्याभरानंतर सोहळा होत आहे. दरम्यान, सामंत यांनी जागेच्या पाहणीसाठी सोमवारी (दि. १३) विशेष पथक नाशकात पाठविले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.