आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी:छत्तीसगढ येथील ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भूमिका नेहते, ईशा रामटेके यांना रौप्य

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

33 व्या वेस्ट झोन ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 रायपूर छत्तीसगढ येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडू भूमिका नेहते हिने साठ मीटर स्पर्धेत 8.08 सेकंदात दुसऱ्या क्रमांक 600 मीटर स्पर्धेत 1.4088 सेकंदात दुसरी येऊन यश संपादन केले तसेच 37 व्या नॅशनल ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत गुहाटी आसाम येथे अवघ्या 1 मिनिट 39 सेकंदात 600 मीटर धावून नेत्रदीपक अशी कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावत रोपे पदक मिळवले आहे.

ईशा रामटेके हिने रायपूर येथील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे तसेच नॅशनल युथ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भोपाळ व 37 वे ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप गुहाटी आसाम येथे मिडले रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

विभागीय संकुलाच्या उपसंचालिका सुनंदा पाटील, अरविंद चौधरी यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे कोच सिद्धार्थ वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून दोघेही मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडाविश्वास त्यांचे कौतुक केले जात आहे.

मीनाताई ठाकरे स्टेडियम विभागीय संकुल हिरावाडी पंचवटी नाशिक येथे सराव करणाऱ्या भूमिका संजय नेहते 14 वर्षा खालील वयोगटात व ईशा निशिकांत रामटेके 18 वर्षा खालील वयोगटात यांची नॅशनल ॲथलेटिक्स साठी निवड झाली होती.

या विद्यार्थ्यांना खेळाडूंना विजयाबद्दल नाशिकच्या क्रीडा प्रशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंना महापालिकेच्या व जिल्हा प्रशासनाने पंचवटीतील हिरावाडी येथे उभारलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मैदानावर सरावासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

इशा रामटेके व नेते या दोघा खेळाडूंनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवत अनेक स्पर्धांमध्ये नाशिकचे नाव उंचावले आहे त्यांच्याबद्दल नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन व क्रीडा संघटनांकडून विशेष कौतुक करत अभिनंदन करण्यात आले आहे. या दोघा खेळाडूंनी समम्ममा या खेळाडूंचे यशाबद्दल त्यांचे कुटुंबीयांनी आनंद उत्सव साजरा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...