आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वे पूर्ववत:भुसावळकडील रेल्वे 24 तासानंतर सुरळीत, देवळालीजवळील लोहशिंगवे येथे पवन एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरल्यानंतर वाहतूक झाली होती विस्‍कळीत

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीजवळील लोहशिंगवे येथे पवन एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरल्यानंतर भुसावळकडील वाहतूक २४ तासांनंतर सोमवारी दुपारी तीन वाजता सुरळीत झाली. रेल्वेसह खासगी सव्वा पाचशे कर्मचाऱ्यांनी अडीचशे ते तीनशे मीटरच्या नादुरुस्त मार्गावर चारशे सिमेंट स्लीपर टाकून २४ तासांत डाऊन मार्ग दुरुस्त केला. लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर गोदान एक्स्प्रेसला या अपघातस्थळावरून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ती पुढे रवाना झाली.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास डाऊन लाइनवरून मुंबईहून बिहारकडे जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर पवन एक्स्प्रेसचे (११०६१) चे लहवित ते देवळाली रेल्वे स्थानकांदरम्यान १२ डबे घसरल्याने अपघात झाला. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मोठी हानी टळली असून केवळ एकजणाचा मृत्यू झाला असून सहा जखमी आहेत. यावेळी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना मदत करीत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर त्यांना पोहोचवण्यासाठी मदत केली. प्रवाशांची गैरसोय नको म्हणून रेल्वे प्रशासनाने त्वरित नाशिक रोड रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वेगाडी रात्री ११.५५ ला सोडली. प्रवाशांना प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. शीख समाजाच्या वतीने प्रवाशांना जेवण देण्यात आले होते. दरम्यान, विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १२ रेल्वेगाड्या रद्द केल्या तर १९ गाड्या या पुणे, दौंड मार्गे तर काही गाड्या सुरतमार्गे वळवण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...