आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल डे:सायकल कॅपिटल; ७५ लाख कि.मी.च्या विक्रमाला नाशिककर घालणार गवसणी ; विविध इव्हेंटमध्ये नाशिक सायकलिस्ट अग्रभागी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शारीरिक आणि मानसिक आरोग्याची सायकल उत्तम असावी यासाठी सायकलिंगला महत्त्व दिले जाते. कोविडकाळात तर नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी सायकलला प्राधान्य दिले. हेच हेरुन सायकल फाऊंडेशनने सायकलिस्ट शहरातील सायकलिस्टला ७५ लाख किलोमीटरचे चॅलेंज दिले. १ जुलैपर्यंत २०२२ पर्यंत हे चॅलेंज पूर्ण करण्यात येणार असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नोंदणीसाठी तयारी करण्यात येते आहे. यानिमित्तासह शहरातील सायकलिंग, सायकल व्यापार, सायकलप्रेमी यासंदर्भात आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त घेतलेला हा धांडोळा...

शहरात वाढती सायकल चळवळ, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सायकलिस्टच्या कामगिरीबरोबरच आतापर्यंत नाशिकमधून २२ आर्यनमॅन घडले आहेत. यामुळे देशात सायकल कॅपिटल म्हणून नाशिक शहर प्रसिद्ध होत आहे. आरोग्य संवधर्नाबरोबरच प्रदुषणमुक्तीचा संदेश देणाऱ्या शहरातील सायकल चळवळीला गेल्या काही वर्षात व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरात सद्यस्थितीला नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन व नाशिक जिल्हा सायकल असोसिएशन या प्रमुख दोन संघटना आहेत. २०१२ स्थापन झालेल्या नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशनने गेल्या १० वर्षात विविध उपक्रमाच्या माध्यमातून मैलाचा टप्पा गाठला आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेले पंढरपूर सायकल वारी, विविध स्पर्धचे आयोजन केले आहे. तर नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे आतापर्यंत साधारणत ३५०० सदस्य आहेत. नाशिक जिल्हा सायकल असोसिएशनच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन यामुळे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा सायकलिस्ट खेळांडू यशस्वी कामगिरी करत आहेत. ते या माध्यमातून सायकलींगचे महत्व देखील पटवून देत आहेत.

सायकल चालविण्याकडे वाढतोय ओढा ^आरोग्य संवर्धनाबरोबर प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांचा ओढा सायकल चालविण्याकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक नागारिकांनी सायकल चालवावी यासाठी उपक्रम राबविले जातात. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची सायकल कॅपिटल अशी ओळख निर्माण झाल्याने सायकलिस्टचा अभिमान वाटतो. - राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन

नाशिक-त्र्यंबकेश्वर सायकल मार्ग सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग साकारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्ध करण्यात येणार आहे.

असे आहे चॅलेंज; लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड नोंदविण्यासाठी तयारी... ^कोरोनाकाळात नागरिकांच्या शारीरिक व मानसिक संवर्धनासाठी नाशिक सायकल फाउंडेशनने ‘मिशन फॉर हेल्थ’ या संकल्पनेत १ ऑगस्ट २०२० ते १ जुलै २०२१ या कालावधीत १००० ते १०००० किलोमीटर सायकल चालविण्याचे चॅलेंज दिले होते. दुसऱ्या वर्षी ‘नेट झिरो इंडिया’ या संकल्पनेनुसार २५००० किलोमीटरचे चॅलेंज दिले हाेते. एका विशिष्ट ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी किती सायकल चालवली याची माहिती संकलित केली जात आहे. १ जुलाई २०२२ पर्यंत या माध्यमातून ७५ लाख किलोमीटरचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट असून त्याची नोंदणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याची तयारी सुरू आहे. - डॉ. मनीषा रौंदळ, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन

बातम्या आणखी आहेत...