आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांचे अनुदान:2800 मुलींना शाळेसाठी सायकल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचा शालेय प्रवास सुकर व्हावा यासाठी मानव विकास योजनेंतर्गत यंदा २८०० मुलींना सायकली मिळणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात आली नव्हती.

नाशिक जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यांतील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या २८०० मुलींना सायकली खरेदी करण्यासाठी नुकतेच ९८ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले. विद्यार्थिनींच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ३५०० रुपये वर्ग केले जाईल.

सायकलीसाठी एका विद्यार्थिनीला पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. जिल्ह्यातील ७३० शाळांमधील पाच किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर राहणाऱ्या मुलींना सायकलींचे अनुदान दिले जाते. सायकली घेण्यासाठी जिल्ह्यासाठी ९८ लाखांचे अनुदानही वर्ग झाले आहे. आता पुन्हा चार हजार मुलींचे प्रस्ताव मानव विकास विभागाकडे दाखल झाले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर या विद्यार्थिनींना सायकली घेण्यासाठीचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ वर्ग केले जाणार असल्याचे मानव विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या याेजनेमुळे विद्यार्थी तसेच पालकांच्या चेहऱ्यावर आनंद असून विद्यार्थिनींची हजेरी सायकलींमुळे वाढेल, असा विश्वास दुर्गम भागातील शाळांनी व्क्त केला आहे.

प्रस्तावानुसार मुलींना लाभ
मानव विकास योजनेंतर्गत जास्तीत जास्त पात्र मुलींना सायकल वाटप करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या योजनेचा मुलींना फायदा होईल. दाेन वर्षांनंतर याेजना पुन्हा सुरू झाल्याचे समाधान आहे. - डाॅ. मच्छिंद्रनाथ कदम, शिक्षणाधिकारी, माध्यमिक व योजना विभाग, जि. प., नाशिक

पहिल्या टप्प्यातील अनुदान वर्ग
शाळास्तरावर आणि शेवटी थेट विद्यार्थिनींच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील अनुदान वर्ग झाले. सायकली घेतल्यानंतर उर्वरित १५०० रुपये वर्ग केले जातील. यासाठी विद्यार्थिनींचे आधारकार्ड झेराॅक्स तसेच इतर कागदपत्रे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थिनींनी संपर्क साधावा. - एच. बी. अहिरे, डीपीओ, मानव विकास

बातम्या आणखी आहेत...