आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; शिक्षक ठार

ताहाराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे (५७) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने शुक्रवारी (दि. ११) धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे. दरेगाव येथील प्राथमिक शिक्षिका मीना बिरारी-भामरे यांचे ते पती होत. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...